शैक्षणिकसामाजिक

स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या ७६ व्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग केज याशाळेमध्ये स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त दि.१२ डिसेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी सकाळी ठीक ९ ते २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील रक्तदान शिबिराचे हे ३१ वे वर्ष आहे.यारक्तदान शिबिराचे काम केज येथील डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी उपजिल्हा रुग्णालय केज व जिल्हा रुग्णालय बीड तसेच त्यांची टीम पाहणार आहे.

तरी बहुसंख्य रक्तदात्यांनी या रक्तदान चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जीवन विकास शिक्षण मंडळ केज तसेच स्वामी विवेकानंद विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विभाग,केज, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज तसेच स्व. प्रमोद महाजन कनिष्ठ महाविद्यालय केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!