खा.रजनीताई पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.वृक्षारोपण वक्तृत्व,निबंध,रांगोळी स्पर्धा,विद्यार्थ्यांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न

केज /प्रतिनिधी
राज्यसभेच्या खासदार काँग्रेसच्या नेत्या केज येथील माऊली विद्यापीठाच्या संस्थापक खा.रजनीताई अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त माऊली विद्यापीठ अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊ वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे सर यांच्या नियोजनातून विविध उपक्रम घेण्यात आले.
प्राथमिक माध्यमिक विद्यालय उमरी येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.रामराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात वाचन स्पर्धा, घेण्यात आली.स्वच्छता अभियान, वृक्षारोपण करण्यात आले.सरस्वती कन्या प्रशाळेत गीतगायन स्पर्धा,फळे वाटप करण्यात आले.राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.
महिला कला महा विद्यालय येथे वृक्षारोपण, माऊली प्राथमिक विद्यालय बीड प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रमिलादेवी पाटील कला महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला.केज येथील बालवाडी,आदर्श प्राथमिक शाळेत सुंदर हस्ताक्षर,रांगोळी,चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.सरस्वती महाविद्यालय,भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय, महाविद्यालया च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.प्राचार्य श्री.लुंगारे,डॉ.हनुमंत सौदागर, डॉ.जी.बीपाटील, मुख्याध्यापक श्री.खोसे, मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे,मुख्याध्यापक श्री. सोनवणे,मुख्याध्यापक राम कांबळे,मुख्याध्यापक नितीन रसाळ, मुख्याध्यापक संदीप सत्वधर,सहशिक्षक विलास भिसे आदींच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले.कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



