सामाजिक
अखिल भारतीय पेशवा संघटना भारताच्या बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी अभय जोशी अंबाजोगाई यांची नियुक्ती

अंबाजोगाई(प्रतिनिधी)
दि ७ डिसेंम्बर रोजी अखिल भारतीय पेशवा संघटना भारत चे संस्थापक अध्यक्ष मा. सचिन वाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड जिल्हा संपर्क प्रमुख संजय देशपांडे अध्यक्षतेखाली बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देउन अभय जोशी
(अंबाजोगाई) यांची नियुक्ती करण्यात आली . यावेळी संजय देशपांडे,महेश राडकर, भास्करराव देशपांडे, विवेक वालेकर,संतोष वडगावकर, उज्वला कुलकर्णी, रजनी देशपांडे, प्रकाशराव देशपांडे, वसंतराव जोशी सर्वच पदाधिकारी यांची उपस्थिती होती.अभय जोशी यांच्या नियुक्ती साठी त्यांचे अंबाजोगाई, बीड संभाजीनगर आणि परिसरात शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.



