सामाजिक

डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड सामाजिक, शैक्षणिक,पर्यावरण, ग्रंथालयीन क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व

व्यक्ती परिचय 

डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचा ११ मे वाढदिवस या निमित्ताने लिहिलेला थोडक्यात लेख.

डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचा जन्म आनंदगांव ता.केज जि. बीड येथील अध्यात्मीक क्षेत्रातील किर्तनकार श्री.आश्रुबा दादा गायकवाड व भागिरथी आक्का गायकवाड या सात्वीक व तात्वीक दांपत्याच्या पोटी झाला.

लहानपणापासून कुशाग्र बुद्धीमत्ता,शैक्षणीक क्षेत्रा तही कुशाग्र बुद्धीमतेने शिक्षण घेतले.सतत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा विक्रम त्यांनी पाहिली पासून शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जपला. तसेच अध्यामिक क्षेत्रा तही लहानपणा पासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यत अध्यामिक ग्रंथवाचन, अर्थ सांगणे, प्रवचन करणे अशी अध्यामिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. तसेच पहिली पासूनच वक्तृत्वाची आवड असल्यामुळे तालुका, जिल्हा,विभाग,राज्य पातळी पर्यंत शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत २२७ पुरस्कार मिळवले.तसेच वादविवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा, काव्यवाचन,सुंदर हसाक्षर या विविध स्पर्धेतही प्राविण्य मिळविले.तसेच त्यांनी विविध संस्थांची उभारणी केली.

१.आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठान,आनंदगांव ता. केज जि.बीड

२ स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड

३.युवा क्रिडामंडळ व व्यायामशाळा,आनंदगांव ता.केज जि.बीड

४.आनंद कृषी वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड

५.आदर्श महिला मंडळ, आनंदगांव ता.केज जि. बीड

६.आशा सोशल एज्युकेशन सोसायटी

७.साधना सार्वजनिक वाचनालय

८.साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय

९.छत्रपती राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय

१०.गंगाई सार्वजनिक  वाचनालय

११.संत भगवानबाबा सार्वजनिक वाचनालय

अशा विविध संस्थांची स्थापना करून सामाजिक,शैक्षणिक, क्रिडाविषयक,पर्यावरण, सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे.नर्सरी, वृक्षारोपण,आदिवासी समुदायासाठी बालवाडी, उन्हाळी शाळा,विविध क्रिडा स्पर्धा,विवाहपूर्व समुपदेशन व विवाह पश्चात समुपदेशन, शेळीपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, तालुकास्तरीय भव्य पशुप्रदर्शन,शेतकरी मेळावे,सेंद्रीय शेती, स्वयंसहायता समुहाच्या उभारणीतून महिला सक्षमीकरण,पाणी पुरवठा योजना,पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आदि विविध उपक्रम व प्रकल्प विविध संस्थेच्या माध्यमातून राज्यशासन, केंदशासन, अशासकीय संख्यांच्या मदतीने व लोकसहभागातून राबविलेले आहेत.त्यांनी केलेल्या युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीवकामगिरी बद्दल २००१ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी आनंद लिमये यांच्या हस्ते नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार बीड जिल्ह्यातून एका युवकाला देण्यात येणारा पुरस्कार वसुदेव बप्पा गायकवाड यांना देण्यात आला.सन्मानपत्र, सन्मानचिन्ह चिन्ह व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.

तसेच त्यांनी आनंद ग्रामीण विकासप्रतिष्ठान, आनंदगांव ता.केज जि. बीड संस्थेने केलेल्या भरीव कामगिरी बद्दल २००१ मध्ये नेहरू युवा केंद्राचा बीड जिल्हयातून एका संस्थेला देण्यात येणारा जिल्हा युवा संस्थापुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी आनंद लिमये यांच्या हस्ते संस्थेला देण्यात आला. समानपत्र,सन्मान चिन्ह, व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कारही संस्थेचे संस्थापक वसुदेव बप्पा गायकवाड व त्यांच्या टीमने स्विकारला.तसेच आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि.बीड यासंस्थेच्या माध्यमातून स्वयं सहाय्यता समुहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मराठवाडा विभागात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्याकडून २००७ मध्ये मराठवाडा विभागातून एका संस्थेला देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट संस्था व्यवस्थापनाचा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख याच्या हस्ते नागपूर येथे संस्थेला देण्यात आला. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, रोख रक्कम देवून संस्थेचा सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक वसुदेव बप्पा गायकवाड व त्यांच्या टीमने स्विकारला.तसेच २००६ मध्ये महाराष्ट्र राज्याकडुन सार्वजनिक ग्रंथालयाच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय “सौ.लिलादेवी सिताराम अग्रवाल ट्रस्ट,सिल्लोड, चा स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड या ग्रंथालयाला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्कार,५००० रोख, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देवून तात्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा,तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार, तत्कालीन राज्याचे ग्रंथालय संचालक मोतीराम मेश्राम यांच्या हस्ते देण्यात आला.हा पुरस्कार स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता.केज जि. बीड चे संस्थापक अध्यक्ष वसुदेव बप्पा गायकवाड व त्यांच्या टिमने स्विकारला.तसेच राज्यस्तरीय समाजसेवा, समाजभुषण,समाजरत्न, व राष्ट्रीय पातळीवरील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार,महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार, रविंद्रनाथ टागोर राष्ट्रीय पुरस्कार,डॉ.बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार,डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार,इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार,अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पुरस्कार असे राज्य व राष्ट्रीय पातळी वरील शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत.

महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत,महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते व परखड व्याख्याते म्हणूनही प्रसिद्ध आहेत.जात,धर्म,पंथ,संप्रदाय, प्रांत,भाषा याच्याही पलिकडे जावून त्यांनी सामाजिक समता,आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम केलेले आहे.

मानवता हिच जात आणि राष्ट्रीयत्व हाच धर्म माणून अविरतपणे व अखंडपणे कार्य चालु आहे.आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सामाजिक, शैक्षणिक, क्रिडाक्षेत्रात, पर्यावरण व सार्वजनिक ग्रंथालय चळवळीत काम करत राहण्याया ध्यास घेतलेला आहे. निस्वार्थ भावनेने स्वतः स्विकारलेले कार्य म्हणून डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड काम करतात. तसेच विविध नेटवर्क जोडूनही ते काम करतात.महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ते मराठवाडा विभागाचे अध्यक्ष व केंदीय सहकार्यवाह म्हणूनही कार्यरत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!