कृषीसामाजिक

खंडोबा यात्रेनिमित्त आनंदगांव येथे तालुका स्तरीय भव्य पशुप्रदर्शनात पशुपालकांनी पशुधनासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी

खंडोबा यात्रा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद,बीड,पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती, केज,खंडोबायात्रा समिती व ग्राम पंचायत, आनंदगांव आणि आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता.केज जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आनंदगांव ता.केज येथ सकाळी ९ ते १२ या वेळात तालुका स्तरीय भव्य पशुप्रदर्शन (वंध्यत्व) आरोग्य शिबीर व पशुपालक मेळावा आयोजित केलेला आहे.

या भव्य पशुप्रदर्शनात शेकडो,हजारो पशुपालकांनी आपल्या पशुधना सह सहभागी व्हावे असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद,बीड, पशूसंवर्धन विभाग, पंचायत समिती,केज, खंडोबा यात्रा समिती, ग्रामपंचायत,आनंदगांव व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि.बीड यांच्यावतीने प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,खंडोबा यात्रा समिती,ग्रामपंचायत सरपंच सौ.अंजना गोविन्द गायकवाड आनंदगांव ता. केज जि.बीडच्या वतीने केज तालुक्यातील पशु पालकांना करण्यात येत आहे.

बीड जिल्हा पशु संवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन आयुक्त,केज तालुका पशुसंवर्धन अधिकारी व केज तालुक्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी, सर्व पशू वैद्यकीय डॉक्टर, कर्मचारी सहभागी होणार आहेत.तरी केज तालुक्यातील पशु पालकांनी हजारोंच्या संख्येने आपल्या पशुधना सह दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सहभागी व्हावे असे आवाहन आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता.केज जि. बीडचे संस्थापक कार्यवाह प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!