कृषीसामाजिक

शासनाने शेतकऱ्यांना दिलेले अतिवृष्टीचे अनुदान बँकेने कर्ज खात्यात जमा करू नये – प्रा.बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

शासनाने शेतकऱ्यांना दिलेले अतिवृष्टीचेअनुदान बँकांनी कर्ज खात्यात जमा करू नये अशी मागणी बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी शासनाकडे केली आहे पुढे जून ते सप्टेंबर दरम्यान संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शासनाने त्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला पण अनेक बँकांनी शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाचे शेतकऱ्याचे बँक खाते बँका होल्ड करीत असून शासनाने शेतकऱ्यांना दिलेले अनुदान हे कर्ज खात्यात जमा करत आहेत.

त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे अतिवृष्टीने झालेले नुकसान प्रचंड आहे मदतीचा हात म्हणून शासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे पण बँकांनी या अनुदाना वर डोळा ठेवून ते कर्ज खात्यात जमा केल्यास शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे.तेव्हा याकडे तात्काळ शासनाने व जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलेले अतिवृष्टीचे अनुदान बँक कर्ज खात्यात जमा करू नये अशी मागणी बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!