
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे चिंचोलीमाळी सारुकवाडी येथील उपसरपंच सौ. गीता धीरज वनवे यांनी जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेची विहीर व पाइपलाइन स्वत:ची व नातेवाईकाची जमीन भिजवण्यास पाणी वापत असुन या प्रकरणी जलजीवन व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करावी अशी मागणी समोर आली असून अशा उपसरपंचावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जातुन करण्यात आली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की,चिंचोलीमाळी ता.केज अंतर्गत सारुकवाडी गाव आहे. सदर गावास पाणी पुरवठाकरण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत एम.आर.ई.जि.एस.च्या माध्यमातून नदीकाठी बुडीत क्षेत्रात विहीर खोदलेली आहे. त्या विहरीवरुन गीता धीरज वनवे व त्यांचे नातेवाईक जलजिवन मिशन अंतर्गत केलेल्या पाईपलाईन व्दारे त्यांच्या शेतासाठी पाणी वापरीत असुन गावातील नागरिक पाण्यासाठी ग्रामपंचायत कडे वारंवार निवेदने देत आहेत.
तसेच गावातील कोणी या विहिरीची विचारणा करण्यासाठी गेले असता ते स्वतः सरपंचअसल्याचा अधिकार सांगत आहे. तरी ती विहीर सन 2019-2020 मध्ये झालेली असुन तेंव्हा पासुन याविहिरीवर त्यांनी अतीक्रमण केलेले आहे. तरी में.साहेबांनी सदरील व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करुन विहीर गावक-यांसाठी खुली करुन देण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जातुन करण्यात आली आहे.गट विकास अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



