शैक्षणिकसामाजिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कानडीमाळी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी .

केज/प्रतिनिधी

दि.१४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कानडी माळी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.गिरी सर,उपाध्यक्ष शाळेच्या आदर्श शिक्षिका श्रीमती दुबाले मॅडम या होत्या. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती जाधव मॅडम,चाटे मॅडम, देशमुख मॅडम,थाटकर मॅडम,शेलार मॅडम व घाडगे मॅडम यांनी प्रयत्न केले.

जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यां मध्ये रुजावे यासाठी भाषण स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवीच्या मुलांनी बाल सभेचे आयोजन केले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतावर मुलांनी ठेका धरला. श्रीमती चाटे मॅडम व गिरी सर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.अशा प्रकारे अतिशय उत्साही वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!