कृषीसामाजिक

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केला तसा शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करावा – वसुदेव बप्पा गायकवाड

केज/प्रतिनिधी

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांना ८ वा वेतन आयोग लागू केला आहे. त्याप्रमाणे देशातील सर्व शेतकर्‍यांसाठी 2006 पासून प्रलंबित असलेला स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि. बीडचे संस्थापक कार्यवाह तथा जेष्ठ समाजसेवक डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोज १५०० रुपये मिळत असताना देशातील शेतकर्‍यांनाही १०००, १२०० रुपये रोज मिळावेत अशी मागणी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केली आहे.

एमएसपीसी नुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. बि -बियाणे,खते, किटकनाशके यांच्या वाढलेल्या किंमती पहाता आणि शेतकर्‍यानेपोटच्या लेकराप्रमाणे पोसलेल्या, जोपासलेल्या पिकांच्या किंमत मात्र वाढत नाहीत.

शेतकर्यांच्या शेतीच्या मशागतीचा खर्च वाढतोय पण उत्पन्न वाढत नाही म्हणून देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा शेतकरी कर्जबाजारी होतोय.आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतोय याची किमान जाणीव ठेवून तरी केंद्र शासनाने स्वामीनाथन आयोग लागू करून शेतीमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केली आहे.केंद्रीय कर्मचारीही माणूसच आहे आणि शेतकरीही माणूसच आहे मग हा भेदभाव का?असा प्रश्न आहे.

केंद्र शासनाने शेतकर्यांच्या लेकरांनाही शिक्षण घेता यावे,उच्च शिक्षित होता यावे, शेतकऱ्यांच्या लेकरांची लग्न व्हावीत,त्यांचाही सुखाचा संसार व्हावा म्हणून तरी २००६ पासून प्रलंबित असलेला स्वामीनाथन आयोग शेतकर्‍यांसाठी लागू करावा व शेतमालाला हमीभाव बाजारभाव मिळावा अशी मागणी आनंद ग्रामिण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि.बीडचे संस्थापक कार्यवाह,जेष्ठ समाज सेवक डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!