वस्ताद लहुजी साळवे हे पहिले सशस्त्र क्रांतीचे जनक आहेत – रोहित कसबे

केज/प्रतिनिधी
सशस्त्र क्रांतीचे जनक, क्रांती गुरु, क्रांती पिता, वीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने केज शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी समाज एकवटला होता.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन सरकरण्यात आले या कार्यक्रमाला केजच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड, शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, नगर पंचायतचे गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार तसेच लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सौ. शितलताई लांडगे,आझाद क्रांती सेना तालुकाध्यक्ष शरद भाऊ थोरात आणि इतरही मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीनगर भागामध्ये शालेय साहित्य वाटप करून लहान विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली. तसेच त्यांना वस्ताद लहुजी साळवे यांचा इतिहास सांगण्यात आला.आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.



