केज तालुक्यात संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक!

केज/प्रतिनिधी
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्यानंतर जरांगे पाटील यांनी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज देखील केला आहे .तसेच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, नार्को टेस्ट मध्ये काय दुध का दुध पाणी का पाणी एकदा कळेलच परंतु सहा कोटी मराठा समाज संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना देव मानत आहे. व त्यांना जिवे मारण्याचा कट रचणे म्हणजे सहा कोटी मराठा समाजाला मारल्यासारखे आहे .व तसेच परळी तालुक्यात धनंजय मुंडे समर्थकाकडुन संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्यांचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करत संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील चौक केवड येथे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.यावेळी केज तालुक्यातील चिंचोली माळी,केवड,वरपगाव, प्रींप्री,काळेगाव घाट येथील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.



