चर्मकार समाजाचा अनुसूचित जाती उप वर्गीकरणाला आळंदी देवाची येथे एकजुटीने तीव्र विरोध

पुणे/प्रतिनिधी
गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी हराळे वैष्णवी समाज धर्मशाळा आळंदी देवाची पुणे येथे संपूर्ण राज्यातून लोक प्रतिनिधी,संघटनांचे अध्यक्ष,पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने महाबैठकीत सहभागी झाले होते. सर्वांनी अनुसूचित जाती उपवर्गीकरला तीव्र विरोध केला आहे.
महा बैठकीत राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी वाघमारे महाराज,राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार बाबुरावजी माने साहेब, माजी मंत्री (दर्जा ) ग्राहक कल्याण व चर्मकार ऐक्य महा परिषद तथा राष्ट्रीय चर्मकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत आप्पा गवळी,वैष्णवी हराळ समाज धर्मशाळेचे अध्यक्ष बाबा कांबळे राष्ट्रीय चर्मकार संघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबई विभाग अध्यक्ष विलास गोरेगावकर तसेच राष्ट्रीय चर्मकार संघाचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष रामपाल कदम,राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र कायदे सलागार अॕड.नारायण गायकवाड, महाराष्ट्रातील संघटनेचे नेते मोठ्या संख्येने सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि समाजसेवक सहभागी झाले होते.
या बैठकीत उपवर्गीकरण विषयी चिंतन करण्यात येऊन उपवर्गीकरणाला संपूर्ण ताकतीने विरोध करून पुढचा लढा उभारण्या साठी समितीची नेमणूक करण्याचे ठरले असून राज्यातील प्रत्येक चर्मकार समाजाला या न्याय हक्काच्या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच लवकरच मा. मुख्यमंत्री,मा.उप मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात येथे चर्मकार समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींचा सहभाग करून उप वर्गीकरण व इतर महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन शासनाने करावे असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान याचे संरक्षण व्हावे तसेच उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करून अनुसूचित जातीची एकजूटीची वज्रमुठ अबाधित राहण्यासाठी आंबेडकरी जनसमुदाय तसेच अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या बरोबरचर्मकार समाजाने सहभागी राहण्याचा ठराव एक मुखाने करण्यात आला आहे.शासनाने अनुसूचित जातीचा बॅकलॉग तसेच पदोन्नती तात्काळ करावी असा ठराव करण्यात आला आहे.पुढील महिन्यात शासनाचे अधिवेशन होत असून या काळात मंत्रालयावर राज्यस्तरीय धडक मोर्चा करण्यात येणार आहे राज्यातून लाखोंच्या संख्येने चर्मकार समाज बांधव सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधी समाज बांधव यांची एकजूट आळंदी देवाची येथील महा बैठकीत झाल्याने चर्मकार समाजाच्या न्याय हक्काचा मोठा लढा उभारण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील काळात होणारे जातीय सर्वेक्षण या संदर्भात समाजाला मार्गदर्शन करण्यात येणार असून शासनाच्या सर्वेक्षणात चर्मकार समाजाच्या प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण होणे महत्त्वाचे असून या सर्वेक्षणात कोणीही वंचित राहू नये याची काळजी समाज बांधवांनी घेण्याचे महत्त्वपूर्ण आहे.तरच चर्मकार समाजाचे पुढील काळात अस्तित्व टिकणार आहे. चिंतन बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित संघटनांचे अध्यक्ष प्रतिनिधी तसेच समाज बांधवांच्या मनोगतात उपवर्गीकरणा ला एक मुखाने तीव्र विरोध करण्यात आला आहे.उपस्थित असणारे मान्यवर पाहुण्यांचे स्वागत वैष्णवी हराळ समाज धर्मशाळा पदाधिकारी यांनी केले.बैठकीतचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले तर आभार तुषार नेटके आणि अनिल सातपुते यांनी मानले.



