सामाजिक

झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती केज चे बेमुदत उपोषण तूर्तास मागे

केज/प्रतिनिधी

झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती केजच्या वतीने शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ पासुन श्री विठ्ठल मंदिर,सभा मंडप, क्रांती नगर,कानडी रोड,केज येथे बेमुदत उपोषण श्री. बाबुराव गालफाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे सकाळी ९-३० वाजल्यापासुन ते १६ मे २०२६रोजी रात्री १०-३० पर्यंत विठ्ठलनगर, कोकीसपीर,क्रांती नगर, कानडीरोड, परिसरातील मूलभूत नागरी समस्या अर्थात पाणी पुरवठा सुरुळीत करणे,बंद असलेले बोअर दुरुस्त करणे,नवीन धनेगाव पाईप लाइन टाकून पाणी पुरवठा पाईपद्वारे चालू करून अंतर्गत रस्ते, नाल्या,पाईप लाईन करणे ईत्यादी आश्वासन प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे तसेच मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करून राऊत सर,व रफिक खुरेशी नगर पंचायत केज,आणि तहसील कार्यालय केज यांच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्ते बाबुराव गालफाडे सर, गंपू मस्के,रशीद तांबोळी, पठाण मामू,प्रा.अजय गालफाडे सर,इरफान तांबोळी,साहिल तांबोळी, बबनराव लांडगे, अशोकराव जाधव, लखन मस्के, इरफान पठाण,अनिल लोखंडे, अरविंद चालक,पांडुरंग कसबे,उमेश काकडे, प्रभू पवार,अर्जुन शिंदे यांच्या उपस्थित तूर्त उपोषण पंधरा दिवसा करीता मागे घेण्यात आले.प्रमुख अधिकाऱी, कर्मचारी यांनी सर्व उपोषणकर्ते यांना शरबत देऊन उपोषण स्थगीत करण्यात आले.मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!