
केज/प्रतिनिधी
जीव विज्ञानातील नवनवीन संशोधन मानवाच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी याविषयी सखोल माहिती होण्यासाठी, तसेच जीवविज्ञानातील नवीन व सद्यस्थितीतील प्रवाह यावर राष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन वनस्पती शास्त्र विभाग बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड व श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव व कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत या चर्चासत्राचेआयोजन करण्यात आले आहे.
या आभासी राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये जीव विज्ञानातील नवीन संशोधन मानवाच्या एकंदरीत निरोगी व निरामय आयुष्यासाठी कसे उपयोगी ठरत आहे याविषयीचे मार्गदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थी,संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग,महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर कार्यरत असणारे नव संशोधक या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे. या आभासी राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. अरविंद धाबे सर, विभाग प्रमुख व अभ्यास मंडळ प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर हे असणार आहेत.या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉ.सी पवित्रा,महिला महाविद्यालय तामिळनाडू व डॉ. जीनेश,अलायन्स विद्यापीठ बंगलोर कर्नाटक हे असणार आहेत.
राष्ट्रीय आभासी चर्चासत्रामध्ये विद्यार्थी व अध्यापकांमध्ये याविषयीचे उद्बोधन व्हावे, जीवविज्ञान शास्त्रातील मानव कल्याणासाठीचे नवीन प्रवाह याविषयी विद्यार्थी,अध्यापकांना सखोल अशी माहिती मिळावी या उद्देशाने हे आभासी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे असे मुख्य संयोजक प्रा.डॉ.नवनाथ काशीद यांनी नमूद केले आहे.राष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालय सामंजस्य करारा अंतर्गत वरील चारही महाविद्यालया च्या वतीने एकत्रितपणे करण्यात आले आहे.हे जीवविज्ञानातील मानव कल्याणासाठीची सध्य परिस्थिती आधारित राष्ट्रीय आभासी चर्चासत्र दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंतआभासी पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी,संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकां नी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव फावडे सर यांनी केले आहे.



