राष्ट्रनिर्माता पुरस्कारा साठी प्रस्ताव पाठवण्याचे शिक्षकांना आवाहन,रोटरी क्लब करणार शिक्षकांचा सन्मान

गेवराई/प्रतिनिधी
कला,क्रीडा,आरोग्य, पर्यावरण,सांस्कृतिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलच्या अखत्यारित असलेल्या गेवराई रोटरी क्लबच्या वतीने दि.५ सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त राष्ट्रनिर्माता पुरस्कार (नेशन बिल्डर अवॉर्ड ) शिक्षकांना दिला जाणार आहे.यासाठी इच्छुक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत हा क्लब स्थापन झाल्या पासून गेल्या तीन महिन्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असून विविध उपक्रमांमधून जनमानसांत आपली प्रतिमा उमटविण्यात यशस्वी झाला आहे. यात पत्रकार बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. दि.५ सप्टेंबर हा दिवस शिक्षणतज्ज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ गेवराई च्या वतीने गेवराई तालुक्यातीलशिक्षकांना राष्ट्र निर्माता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी आपले प्रस्ताव रोटरी क्लब गेवराई यांच्याकडे दि. ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावेत. शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांच्या समिती कडून प्रस्तावाचीछाननी करून सदर पुरस्कार वृत्तपत्रातून जाहीर केले जातील.एका भव्य शानदार समारंभात शिक्षण तज्ज्ञांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरित केले जातील.
सन्मानपत्र , सन्मानचिन्ह , महावस्त्र,शाल , श्रीफळ, बुके देऊन सन्मान केला जाईल.गेवराई तालुक्यातील शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक,आरोग्य, राष्ट्रीय कार्य,कला, क्रीडा,सांस्कृतिक, पर्यावरण आदी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळून त्यांच्या हातून राष्ट्र उभारणीचे कार्य उत्तम रीतीने व्हावे हा या पुरस्कारा मागील उद्देश आहे.गेवराई तालुक्यातील पात्र शिक्षकांनी आपले प्रस्ताव कार्याच्या पुराव्यासह रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे (942274 4266 ) आणि सचिव प्रवीण जैन यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन रोटरी क्लब चे प्रोजेक्ट सर्विस चेअरमन धर्मराज करपे,समिती सदस्य गणेश कुलकर्णी मनोज टाक ,डॉ.किशन देशमुख , महेश मोटे,डॉ. नागनाथ मोटे,जयराज कौराणी,उमेश बजाज आदींनी केले आहे.



