बनसारोळा येथील शेतकरी बांधवांसाठी श्रध्दा जोगदंडचा आदर्श उपक्रम

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवी ‘अ’ मधील विद्यार्थिनी श्रद्धा अनिल जोगदंड हिने विलक्षण समाजभान दाखवत आदर्श घालून दिला आहे.आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पिगी बँकेत जमा केलेले पैसे तिने खर्च न करता, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केले. तिने हा निधी डॉ. अशोकराव थोरात यांच्या स्वाधीन केला.
श्रद्धाच्या या सामाजिक जाणिवेच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून,लहानग्या वयात दाखविलेला हा मोठा त्याग सर्व विद्यार्थ्यां साठी व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावकऱ्यांसह शिक्षक, शाळा व्यवस्थापन व स्थानिक मंडळींनी तिच्या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.श्रद्धाने दाखवलेला हा आदर्श समाजातसंवेदनशीलता व परोपकाराची नवी उमेद निर्माण करणारा आहे.



