प्रशासकीयसामाजिक

सिरसाळा येथे सहकारी पतसंस्था संचालक, कर्मचारी यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न .

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,मा.जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने सिरसाळा येथे नागरी, ग्रामीण सहकारी पत संस्थेचे संचालक, कर्मचारी यांच्याकरिता दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिरसाळा चे चेअरमन श्री.वसंत निर्मळ व प्रमाणित लेखा परीक्षक श्री.सी.ए.खोडसे साहेब यांच्या शुभ हस्ते श्री. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस.आर.कोळे यांनी सहकार कायदा,नियम या विषयावर मार्गदर्शन केले.

अभ्यासू मार्गदर्शक तज्ञ श्री.खोडसे सी.ए. प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड यांनी ठेवी सुरक्षितता, कर्ज वितरण करत असताना घ्यावयाची दक्षता, एनपीए,थकबाकी, थकबाकीदारावर 101 ची कायदेशीर कार्यवाही, ऑडिट संदर्भात व भविष्यात ठेवीदार व संस्था अडचणीत येणार नाही याविषयी सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच श्री.विठ्ठल मुळे प्रमाणित लेखा परीक्षक यांनी संस्था अवसानात येणार नाही याविषयी घ्यावयाची दक्षता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

समारोप प्रसंगी चेअरमन श्री.वसंत निर्मळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.सूत्र संचालन,आभार वर्ग संयोजक श्री.एस.आर. कोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी पार पाडण्यास राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरसाळा कर्मचारी,संचालक यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!