मंगळवारी रिपाइंचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे महा धरणे आंदोलन

केज/प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने युवा रिपाइंचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक २३ सप्टेंबर रोजी गायरान धारकांच्या न्याय व हक्कासाठी भव्य महाधरणे आंदोलन आयोजित केले आहे.
या धरणे आंदोलनात,सन १९९० च्या शासन परिपत्रका नुसार गायरानधारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावीत.भूमिहिन गायरान धारक, शेतमजुर व ऊसतोड कामगार यांना प्रतिमाह रु.३ हजार पेन्शन (मानधन)लागु करण्यात यावे.गायरान धारकांच्या ७/१२ व ८-अ उतारा क्षेत्रावर असणारे पोट खराब क्षेत्र काढण्यात यावे.या मागण्याचा समावेश आहे.
पप्पू कागदे यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन यशस्वी करण्यासाठी केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या सोबत जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड,तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे,आय टी सेल तालुका प्रमुख सुरज काळे,तालुका उपाध्यक्ष प्रशांत हजारे,येवता सर्कल प्रमुख हरिश गायकवाड,विनोद गायकवाड,रोहित कांबळे, प्रदिप शिनगारे, किशोर गरूड,नवनाथ खाडे,दिलीप खाडे, सरवदे ,महिला आघाडी येवता सर्कल प्रमुख सरस्वती शिनगारे, भगवान कांबळे,रवी गायसमुद्रे,अन्वर शेख, वैभव जाधव,आदर्श जाधव यांनी केज तालुक्यातील गाव न गाव पिंजून काढून गायरान धारक आणि ऊसतोड मजूर यांनी मोठ्या संख्येने महाधरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी कानडीमाळी येथे येवता सर्कल नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी संवाद साधताना नागरिकांनी विविध समस्या आणि अडी अडचणी सोडविण्या साठी कार्यकर्त्यांनी मदत करण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे.



