क्रांतीनगर भागातील नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन संपन्न, झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्या संदर्भात निवेदन सादर

केज/प्रतिनिधी
झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीच्या वतीने केज तहसीलदार यांना विवीध मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये क्रांतीनगर कानडी रोड येथे १९८३-१९८४ पासून शासनाने ९१ व ९५ असे १८६ घरे निराधार, भूमिहीन, बेघर, अनुसूचित जाती जमाती,भटक्या विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्यांक लोकांना एक गुंठा जागा व पाच पत्रांचे घरकुल बांधून वाटप करून कबाली पत्रक म्हणजेच मालकी हक्क दिलेली होता. परंतु गेल्या ४० वर्षात कुटुंबातील संख्या वाढल्याने क्रांतीनगर वसाहतीत पाचशे ते सहाशे घरे झालेले आहेत.तरी कुटुंबसंख्या वाढल्याने दीड ते दोन गुंठे जागा देऊन मालकी हक्क देण्यात यावा तसेच सर्व नागरी सुविधा या झोपडपट्टी धारकांना देण्यात याव्यात,यासाठी सदरील निवेदन सादर करण्यात आले.
क्रांतीनगर येथील विठ्ठल मंदिर,महात्मा फुले सभागृह,सत्य शोधक अण्णाभाऊसाठे सभागृह,अंगणवाडी, जिल्हा परिषदप्राथमिक शाळा,तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह यांची जागा मोजून नगरपंचायत केज अभिलेखात नोंद करण्यात यावी.वरील सर्व सभागृह,शाळा व अंगणवाडी यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. यश कंन्स्ट्रक्शन कंपनी ने अपूर्ण ठेवलेले काम तात्काळ करण्यात यावे क्रांतीनगर वसाहतीत जुने रस्ते व नाल्या तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात,तसेच मुस्लिम समुदायाकरिता कब्रस्तानासाठी जागा देण्यात यावी,नवीन पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
वसंत महाविद्यालयासमोर सीसीटीव्ही बसवण्यात यावेत,रमाई घरकुल योजना,पंतप्रधान आवास योजना या घरकुल योजनेतील पहिला व दुसरा हप्ता तात्काळ देण्यात यावा, अपंग,संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना नागरिकांची केवायसी होत नसल्याने पर्यायी व्यवस्था करून बंद दिलेल्या पगारी पुन्हा सुरू करण्यात याव्यात. तसेच क्रांतीनगर येथे मंजूर असलेले स्वस्त धान्य दुकान क्रांतीनगर भागातच सुरू करण्यात यावे.
याकरिता जिल्हाधिकारी साहेब, उपजिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब केज तसेच मुख्याधिकारी साहेब नगरपंचायत कार्यालय केज, पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे केज यांना माहितीस्तव सादर करण्यात आले. सदरील निवेदनावर बाबुराव गालफाडे सर, लक्ष्मण जाधव,इरफान पठाण,अनिल लोखंडे, शितलताई लांडगे, योगेश गायकवाड, अजय गालफाडे,आरेफ खुरेशी,नागेश जावळे, भीमा हजारे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



