प्रशांत भैय्या गाडे यांच्या कडून पूरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूंची मदत,पुरग्रस्त नागरिकांना दिलासा

केज/प्रतिनिधी
मागील काही महिन्यात मराठवाडयामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावातील घरात पाणी शिरले होते तर अनेकांच्या शेतातील पिके भुईसपाट झाली.त्यामुळे मराठवाड्यातील जन जीवन विस्कळित झाले होते.
त्यामुळे आपण आपल्या समाजाचे काही देणं लागतो, आपल्या घासातला घास आपण इतरांना दिला पाहिजे या भावनेतून मुंबई चे युवा उद्योजक प्रशांत भैय्या गाडे यांनी मराठवाड्या तील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत ब्लँकेट,चादरी,अन्नधान्य, तेल ,बिस्किटे, फरसाण, चटणी ,व अन्य गृहउपयोगी वस्तू, औषधे खाद्य पदार्थ वाटप केली.
या वेळी शिवप्रसाद ठोंबरे, अभिषेक भिसे,राहुल ठोंबरे, बप्पा भिसे,राम काळे,प्रदीप ठोंबरे,पोपट लांडगे, राजाभाऊ इटकर, शेळके अण्णा,विक्रम चोन्दे,आकाश भैय्या फरके, शशिकांत काळे, वैभव काळे,विलास शिनगारे,राहुल इंगळे, विशाल यादव,नितीन काळे सर्व मित्र परिवार उपस्थित होता.दरम्यान या मदतीमुळे पुरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.



