सामाजिक

केज तालुक्यातील हादगाव ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय, राजकारणाला विसरून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलवली दिवाळीची आनंदरेषा! ग्रामस्थांच्या एकजुटीतून तालुक्यातील पहिला उपक्रम; घरपट्टी व करवसुलीतील निधीतून फराळ किटचे वाटप

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील हादगाव ग्रामपंचायतीने सामाजिक जाणीवेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना फराळ किटचे वाटप करण्यात आले.घरपट्टी,नळपट्टी व इतर कर वसुलीच्या रकमेपैकी पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून,या निधीतून दिव्यांगांना फराळाचे किट वाटप करण्यात आले.

केज तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध राजकीय नेते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम हाती घेताना दिसतात,मात्र हादगाव ग्रामपंचायतीने राजकीय हेतूपेक्षा सामाजिक भावना अग्रस्थानी ठेवून घेतलेला हा उपक्रम तालुक्यातील पहिला व अनुकरणीय ठरला आहे.ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेला हा उपक्रम समाजकारणा चे उत्तम उदाहरण ठरला असून, ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमात सरपंच उमेश यादव,उप सरपंच श्रीराम वायबसे, ग्रामसेवक वरपे साहेब, ग्रामपंचायत सदस्य अविनाश यादव,गणेश वायबसे,महादेव वायबसे, मेजर हनुमंत (अण्णा) वायबसे,पत्रकार ज्योतीराम सावंत,रोजगार सेवक रवींद्र वायबसे, बी.जी.गदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला दिव्यांग बांधव,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुललेले समाधानाचे हास्यच या उपक्रमाचे यश ठरले असून,हादगाव ग्राम पंचायतीने समाजकारणा ला नवी दिशा दिल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!