सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा केज येथे पत्रकार लिंबराज गायकवाड यांची सदस्य पदावर निवड

केज/प्रतिनिधी

दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी आणि निष्ठेने कार्य करणारे लिंबराज शंकरराव गायकवाड मौजे येवता ता.केज,जि. बीड यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा, केज येथे सदस्य पदावर निवड करण्यात आली. ही निवड पत्रकारितेतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल म्हणून करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.केज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी सर यांच्या मार्गदर्शना खाली तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर करण्यात आली.यावेळी सचिव विजय बिक्कड,तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार मिसाळ,पांडुरंग कसबे, विश्वास राऊत,कृष्णा केदार,इलेक्ट्रिक बाइक शोरूमचे मालक मच्छिंद्र लांब साहेब,पत्रकार अशोक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कसबे यांनी केले. सचिव विजय बिक्कड यांनी संघटनेच्या स्थापने पासूनचा इतिहास आणि पत्रकार संघाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली.त्यांनी सांगितले की,पत्रकारिता ही केवळ बातमी देण्या पुरती मर्यादित नसून समाजातील सत्य,न्याय आणि पारदर्शकतेसाठी लढण्याचे प्रभावी माध्यम आहे.

तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या सभासद लिंबराज गायकवाड यांना शुभेच्छा देत संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मनोगत व्यक्त करताना नंदकुमार मिसाळ यांनी आदर्श पत्रकारितेचे तत्त्व, जबाबदारी आणि सामाजिक कर्तव्य यावर सखोल विचार मांडले. त्यांनी सांगितले की, पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तिची जबाबदारी अधिक मोठी आहे.सत्य आणि निष्पक्षता जपणे हीच खरी पत्रकाराची ओळख आहे.

लिंबराज गायकवाड यांची निवड ही केवळ वैयक्तिक गौरवाची बाब नसून केज तालुक्यातील पत्रकारितेला बळकटी देणारी घटना ठरते. स्थानिक पातळीवर सक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख पत्रकारांची गरज लक्षात घेता,संघटनेत नव्या ऊर्जेची भर पडल्याचे चित्र दिसते. ही नियुक्ती भविष्यात संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना अधिक प्रभावी पणे वाचा फोडण्यास हातभार लावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नियमानुसार वाटचाल करणार असल्याचे लिंबराज गायकवाड यांनी सांगितले.यावेळी त्यांनी पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!