जीवाचीवाडी येथील रस्त्यावर पडलेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटेना,केज पोलीसांचे ओळख पटविण्यासाठी आवाहन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे दि.२९ रोजी शुक्रवारी सायंकाळी अनोळखी मृतदेह असल्याचे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिवाचीवाडी तलावा पासून चिखलबीडकडे जात असलेल्या रस्त्याच्या एक कि.मी. अंतरावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सरपंच पती यांनी केज पोलिसांना दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
याबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.या अनोळखी व्यक्तीची कोणालाकाही माहिती मिळाल्यास केज पोलिस ठाण्यात संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले असुन आज पर्यत अनोळखी प्रेताची ओळख पटली नसल्याचे विडा बिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक सोनवणे यांनी माहीती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

