सामाजिक

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज शौर्य, पराक्रम, सामर्थ्य व बुद्धीचे प्रतिक – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज शौर्य, पराक्रम, सामर्थ्य व बुद्धीचे प्रतिक होते असे प्रतिपादन जेष्ठ विचार वंत,जेष्ठ समाज सेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे आयोजित १४ मे रोजी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणीक बप्पा गायकवाड हे होते.

प्रमुख बुधभुषणम ग्रंथ वाचक संजय सोनवणे, एस.के.वैरागे यांनी बुधभुषणम,नखशिखांत या छत्रपती संभाजीराजे लिखित ग्रंथांचे वाचन केले.प्रमुख पाहुणे म्हणून नारायणभाऊ गायकवाड रावसाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.मोठया संख्येने वाचक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.दि. १२मे २०२६ रोजी संत मुक्ताबाई पुण्यातिथी व परिचारिका दिन साजरा करण्यात आला.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!