सामाजिक

राजेश घोडे यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार,आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून राज्यभरात काम करणाऱ्या राजेश घोडे चा सन्मान,बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने जाहीर केला पुरस्कार 

बीड/प्रतिनिधी

आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांना बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार जाहीर केला आहे.राजेश घोडे यांनी आपल्या आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून राज्यभरात सामाजिक उपक्रमाचा धडाका लावला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांनी समाजातील वंचित,शोषित,उपेक्षित घटकांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला आहे.

राजेश घोडे यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेली झुंज ही राज्यातील समाज सेवेमध्ये कामकरणाऱ्या लोकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली आहे. राजेश घोडे यांचा प्रत्येक श्वास हा तरूण समाजकल्याणासाठी वाहिलेला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची त्यांची धडाडी प्रेरणादायी आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन बुद्धिस्ट फाउंडेशनऑफ इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बुद्धिस्ट फाउंडेशनऑफ इंडियाचे सचिव प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे यांनी एका लेखी पत्राद्वारे हा सन्मान जाहीर केला आहे.हा पुरस्कार राजेश घोडे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते विलासराव कारके,अरुण आवाड, पिंटू आडागळे, लक्ष्मण आवाड,मंगेश शिंदे, महादेव आडागळे, विलास शिंदे, महादेव साळवे यांनीफटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला आहे दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्ममहोत्सवात हा “समाजसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे.

प्राचार्य कांबळे यांचे राजेश घोडे यांना पत्र 

समाजातील वंचित, शोषित,उपेक्षित घटकांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आपण केलेली झुंज ही आमच्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली आहे. आपला प्रत्येक श्वास हा तरूण समाजकल्याणा साठी वाहिलेला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची आपली धडाडी पिढीमध्ये चेतना जागविण्याचे आपले कार्य आणि सेवाभावाने झिजविलेलं आपलं आयुष्य हे खऱ्याअर्थाने समाजसेवेचं मूर्तिमंत उदाहरण आहे.आपल्या या कार्याचा गौरव करण्यासाठी दि बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया यांना मनस्वी अभिमान वाटतो. प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे सचिव,दि बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!