सामाजिक

महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी ; केज येथे जोडे मारो आंदोलन संपन्न रोहित कसबे यांची तहसीलदारांकडे मागणी; छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निषेध

केज/प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील प्रमुख स्तंभ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांच्या विषयी सोशल मीडिया वर अत्यंत अपमानकारक व बेताल वक्तव्य करून महापुषांची विटंबना करणाऱ्या प्रवृत्तींचा केज येथे तीव्र निषेध करण्यात आला.या समाजकंटकां वर प्रशासनाने तात्काळ कायदेशीर बंदोबस्त करावा,अशी मागणी रोहित कसबे यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या निंदनीय कृत्याचा निषेध म्हणून मंगळवारी केज येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात संबंधित व्यक्तींच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करून तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला.

सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजू थाटे,कपिल सरवदे आणि स्नेहा कांबळे नामक व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांबद्दल अत्यंत अपशब्द वापरून दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.या व्यक्तींच्या बेताल वक्तव्यांमुळे समाजात शांतता बिघडून सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते,तसेच दंगल घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

निवेदनातील प्रमुख मागण्या

महापुरुषांची विटंबना करणाऱ्या राजू थाटे, कपिल सरवदे आणि स्नेहा कांबळे यांच्यावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा,सोशल मीडियावर त्यांच्याकडून करण्यात आलेली आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टीका-टिपणी तात्काळ हटवण्यात यावी.

तीव्र आंदोलनाचा इशारा

काल झालेल्या ‘जोडे मारो’ आंदोलनादरम्यान आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कठोर कारवाई झाली नाही,तर आगामी काळात संपूर्ण केज तालुक्यात तसेच जिल्ह्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील,असा इशाराही रोहित कसबे व उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!