लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे छायाचित्र असलेल्या बॅनरची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी-धीरज वनवे

केज/प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे छायाचित्र असलेल्या बॅनरची विटंबना करणाऱ्या समाजकंटका विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन केज पोलीस ठाणे येथे धीरज वनवे यांच्यासह नागरिकांनी दिले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आलेले होते. दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी चिंचोली माळी येथील रोहन गलांडे हा जरांगे पाटलांचा व खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा ख़देसमर्थक आहे या व्यक्तीने सदर बॅनर काढून त्यावर मद्यधुंद अवस्थेत झोपुन आमच्या भावना दुखावले आहेत.
या कृतीमुळे गावकऱ्यात प्रचंड रोष व संतापाची लाट निर्माण झाला असून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून सदर प्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधानानुसार (आय पी सी) प्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच यापूर्वीचे गंभीर गुन्हे विचारात घेऊन आरोपी विरोधात यमपीडीए अथवा तडीपारीची कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा पोलीस प्रशासनास इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
या लेखी निवेदनावर धीरज वनवे, वैभव केंद्रे, बाळासाहेब वनवे, शशीकुमार वनवे, सचिन वनवे, परमेश्वर केंद्रे, बाळासाहेब गालफाडे, विक्रम वनवे, सुभाष फुंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याच नराधमाने काही दिवसापूर्वी गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बसलिंग आप्पा भुजबळ यांच्या स्मारकाची विटंबना केली होती व तशी तक्रारही केज पोलीस स्टेशनला करण्यात आलेली होती अशा प्रतिक्रिया नागरिकांतून ऐकण्यास येत आहेत व तेव्हाही सदर स्मारकावर बसून सदरचा युवक हा दारू पित असताना चे व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना त्याही वेळी दुखावल्या होत्या त्यामुळे अशा जातियवादी युवकावर कठोरात कठोर कारवाई करावी.



