
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे इतिहास विषयाचे शिक्षक रामदास अंबाड सर यांना यावर्षीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळा चे सचिव बालासाहेब काकडे सर यांच्या पुढाकारातून मागील वर्षापासून हा पुरस्कार देण्याची परंपरा सुरू झाली आहे.शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य,विद्यार्थ्यांशी असलेले घट्ट नाते आणि अध्यापनातील नवनवीन प्रयोग या गुणांच्या आधारे यावर्षीचा मानाचा पुरस्कार अंबाड सरांना देण्यात आला.
समारंभाच्या वेळी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक काकडे, सचिव बालासाहेब काकडे,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम,सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी अंबाड सरांचा सत्कार करून त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
रामदास अंबाड सर गेल्या अनेक वर्षांपासून इतिहास विषय शिकवत असून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासा बरोबरच राष्ट्रीय जाण, सामाजिक जबाबदारी व नैतिक मूल्यांची जपणूक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन समाजात आपले स्थान निर्माण करीत आहेत.या पुरस्कारामुळे केवळ अंबाड सरांचा नव्हे,तर संपूर्ण विद्यालयाचा मान वाढला असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.



