आझाद क्रांती सेनेच्या केज शहर उपप्रमुख पदी अनिल अण्णा लोखंडे यांची नियुक्ती

केज/प्रतिनिधी
बीड सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आझाद क्रांती सेना कार्यरत असून युवकां मध्ये या संघटने विषयी आकर्षण निर्माण झालेले दिसत आहे. दररोज शेकडो तरुण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत.सेनेच्या कामाची पद्धत आंबेडकरवादी असून सर्वच महापुरुषांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून, अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सदरील संघटना महाराष्ट्रभर जोमाने वाढताना दिसत आहे. याचाच एकभाग म्हणून केज येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सेनानायक राजेशजी घोडे यांच्या उपस्थितीत अनिल अण्णा लोखंडे यांची आझाद क्रांती सेना शहर उपप्रमुखपदी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना सेनानायक राजेशजी घोडे म्हणाले की, आझाद क्रांती सेना ही उपेक्षित,वंचित,मागास, भटक्या,अल्पसंख्याक, पीडित, अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. येणाऱ्या काळामध्ये या संघटनेचा आपण भाग असल्याचा सर्वांना अभिमान व स्वाभिमान वाटावा या पद्धतीचे काम आझाद क्रांती सेने मार्फत होणार आहेत. यावेळी सेनेचे तालुकाध्यक्ष शरदजी थोरात,शहरप्रमुख इरफान पठाण,ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुरावजी गालफाडे सर,सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विनायकरावजी लोंढे, आझाद क्रांती सेनेचे माजलगाव तालुका अध्यक्ष अशोकरावजी ढगे,भिसे सर,पत्रकार पी.डी.कसबे इत्यादी यावेळी उपस्थित होते.



