Uncategorized

फटाके मुक्त दिपावली, पर्यावरणीय दिपावली साजरी करूया,आरोग्य दायी व आनंददायी जीवन जगू या -डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड 

केज/ प्रतिनिधी

फटाके मुक्त,आरोग्यदायी दिपावली साजरी करूया, आरोग्यदायी वआनंददायी जीवन जगूया यासाठी प्रत्येक नागरिकाने याची दक्षता घ्यावी असे आवाहन जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते तथा आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीडचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य, डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे.दिपावली हि आनंददायी वआरोग्यदायी साजरी करण्यासाठी प्रत्येकाने फटाके मुक्त व पर्यावरणीय दिपावली साजरी करावी असे अवाहन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

फटाके फोडल्यामुळे प्रदूषण हे पर्यावरणाला हानीकारक व नुकसान दायक आहे,तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी ही घातक व अपायकारक आहे.आर्थिक,शारीरीक, आरोग्य विषयक, पर्यावरण विषयक हानी टाळण्यासाठी सर्वांनी फटाकेमुक्त दिपावली साजरी करावी असे आवाहन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!