सामाजिकसांस्कृतीक

कवी राजाराम कांबळे सर यांची आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे येथे ५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या काव्यसंमेलन अध्यक्षपदी व काव्य सादरीकरणासाठी निवड

पुणे/प्रतिनिधी

पुणे येथील एस.एम. जोशी सभागृहात दिनांक २ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल या काव्य महोत्सवात भव्य विचार मंचावर स्वरचित काव्य सादरीकरणासाठी एस. के.पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय कुर्ला मुंबई येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आयु.राजाराम भीमराव कांबळे सर यांची निवड झाली असून ते मूळचे

कोल्हापूर जिल्ह्या तील गारगोटी गावचे रहिवासी आहेत. अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय सहभागी होत असतात. अनेक काव्यसंग्रहामध्ये त्यानी काव्य लेखन केलेले असून काव्य संमेलनामध्ये सुद्धा ते सक्रिय असतात.त्यांच्या या कार्याबद्दल अनेक वेळा त्यांना सन्मानित केले गेले आहे.

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल या काव्य महोत्सवाची सुरुवात फुले प्रेमी संविधानदूत विजय वडवेराव सर यांनी केली आहे.हा काव्य महोत्सव निशुल्क असून महा मानवांच्या विचारांचा प्रचार प्रसाराचे कार्य वडवेराव सर करीत आहेत.या महोत्सवात कवी राजाराम कांबळे सर हे काव्य सादरीकरण करण्याबरोबरच विचार मंचावर अध्यक्षपद भूषविणार आहेत.विजय वडवेराव सर यांनी तसे त्यांना निवडीचे पत्र ही दिले आहे.या निवडीबद्दल कवी राजाराम कांबळे सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!