लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त आडस येथे होणार सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर – रमेशराव आडसकर

केज/प्रतिनिधी
सत्तरच्या दशकातील केज,अंबाजोगाई तालुक्यातील सहकार, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची गंगा खेचुन आणणारे लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या कामाच्या माध्यमातून अजुनही शेतकरी, शेतमजूर यांच्या मनात कायम स्मृती आहेत. त्यांचा हाबाडा हा शब्द संपुर्ण महाराष्ट्रात गाजला होता.लोकनेते माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्यापुण्यतिथी निमित्त दि.12आॕगष्ट 2025 मंगळवारी छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर होणार असुन सकाळी अकरा वाजता ह.भ.प. महंत भगवान महाराज शास्त्री वरपगांवकर यांचे पुण्यतिथी निमित्त किर्तन होणार आहे. अशी माहिती अंबा सहकारी कारखाना, अंबाजोगाईचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी दिली आहे.
या सर्व कार्यक्रमांना व महाप्रसादासाठी केज, अंबाजोगाई,धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातील सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन रमेशराव आडसकर व ऋषीकेश आडसकर यांनी केले आहे.



