जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी निवासी विद्यालयाने पटकावले प्रथम दोन पारितोषिक

केज/प्रतिनिधी
५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.६ जानेवारी २०२६ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत अंबाजोगाई येथे संपन्न झाले.बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालय केज या शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकगटातून आकाश केदार यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर उच्च प्राथमिक दिव्यांग गटातून कु.पुजा ठोंबरे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या दोन्ही प्रयोगांची दि.२८ जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पुजा ठोंबरे हिस विज्ञान विषय शिक्षिका मनिषा नागरगोजे,श्रुती लहाने मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड साहेब, राजेश कापसे,प्रा.डॉ. कविता गित्ते यांनी या सर्वांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



