गजानन बिडकर राज्य स्तरीय पुरस्कार मूकनायक नॅशनल अवॉर्ड – २०२६ ने सन्मानित,धर्माबाद येथे जंगी स्वागत,पत्रकारिता व समाजकार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर गौरव.

नांदेड/प्रतिनिधी
पत्रकारिता,समाजसेवा आणि जनजागृती क्षेत्रा तील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पुरोगामी पत्रकार संघ (भारत) चे तेलंगणा राज्याध्यक्ष तथा साप्ताहिक महिमा खादीचा चे मुख्य संपादक गजानन गंगाधरराव बिडकर यांचा नांदेड येथे राज्यस्तरीय सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना प्रतिष्ठेचा “मूकनायक नॅशनल अवॉर्ड २०२६” जाहीर झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
दैनिक वीर शिरोमणी तसेच दैनिक व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य समारंभात हा गौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्री.बिडकर यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पहार प्रदान करून गौरविण्यात आले.गजानन बिडकर हे पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित,पीडित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवूनदेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडत प्रभावी जनजागृती केली आहे.त्यांच्या निःस्वार्थ, ध्येयवादी आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान जाहीर करण्यात आला.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना गजानन बिडकर म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून सत्य,समाजहित आणि जनजागृतीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रत्येक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचा आहे.हा पुरस्कार पुढील कार्यासाठी अधिक प्रेरणा देणारा ठरेल.”
धर्माबाद येथे जंगी स्वागत व विशेष सत्कार
नांदेड येथील सन्माना नंतर गजानन बिडकर यांनी धर्माबाद येथे सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान साप्ताहिक नव्या युगाची वाटचाल चे मुख्य संपादक प्रेमसिंह इंदरसिंह चव्हाण आणि मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संजय (बंटी) काडगेवार,सूर्यकांत हनमंते,समर्थ फोटो स्टुडिओचे संचालक सत्यनारायण पांचाळ तसेच पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.भेटी दरम्यान पत्रकारिता, सामाजिक कार्य,संघटन विस्तार,कौटुंबिक विषय तसेच समकालीन राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. उपस्थितांनी गजानन बिडकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दोन राज्यांतील गौरवाचा दुहेरी आनंद
महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरा वरील पुरस्काराची घोषणा आणि तेलंगणात पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून प्रभावी नेतृत्व या दुहेरी गौरवामुळे गजानन बिडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पत्रकारिता,समाज सेवा व जनजागृतीच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला असून,आगामी काळात त्यांच्या कार्याचा विस्तार अधिक व्यापक पातळीवर होईल,असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे.



