सामाजिक

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न 

केज /प्रतिनिधी

आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथील केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस केज येथे सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. सामाजिक व संघटनात्मक कार्यातून तालुक्यात ठसा उमटवणारे थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाई मोहन गुंड (शेतकरी कामगार पक्ष राज्य सरचिटणीस) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात थोरात यांच्या कार्याचा गौरव करताना, युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रकार विजय बिक्कड, नंदुलाल मिसाळ, पांडुरंग कसबे, लिंबराज गायकवाड, सचिन साखरे तसेच कृष्णा केदार, विश्वास राऊत, हिरामण काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन केदारनाथ मल्टिसर्व्हिसेसच्या वतीने करण्यात आले होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!