क्रिडा

केजच्या जीवन शिक्षण विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत चमकदार यश

केज/प्रतिनिधी

दिनांक २४ सप्टेंबर २०२५रोजी बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत केज येथील जीवन शिक्षण प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत बीड जिल्ह्यात आपला ठसा उमटवला.

या स्पर्धेत इयत्ता दहावीतील विद्यार्थी चि.केदार निलेश श्रीकांत याने अप्रतिम कौशल्य दाखवत जलतरण प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.त्याच्या या उत्तुंग यशामुळे विद्यालयाचा लौकिक उंचावला असून संस्थेचा सर्व शिक्षकवर्ग ,विद्यार्थी व पालकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.या कामगिरीमध्ये क्रीडा मार्गदर्शक साजेद पठाण सर,भीमाशंकर तोंडसे सर,अश्विनी दळवे मॅडम व किशोर मस्के सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

आगामी विभागीय स्पर्धेतही चि.केदार श्रीकांत अधिक मोठे यश मिळवेल,असा विश्वास व्यक्त करत संस्थेचे सचिव हारूनभाई इनामदार, सहसचिव यासीनभाई इनामदार, मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे सर, बन्सल क्लासेसचे सह संचालक गोविंद ठोंबरे सर तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब ठोंबरे सर यांनी खेळाडूस हार्दिक शुभेच्छा दिल्या.संस्थेचा हा अभिमानास्पद क्षण केज परिसरात व क्रीडा क्षेत्रात सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून चि.केदार श्रीकांत याच्याकडून विभागीय तसेच राज्य स्तरीय स्पर्धेतही यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!