सामाजिक

साबला येथील आदर्श सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न 

केज/प्रतिनिधी

साबला ता.केज येथील ग्रामपंचायत आदर्श सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त साबला येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.रविवार दि.११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गट साधन केंद्र केजचे गटशिक्षण अधिकारी श्री.सुनील केंद्रे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये शिवाजीराव रोडे, पत्रकार डी.डी.बनसोडे, संतोष गालफाडे,अजय भांगे,चंद्रकांत पाटील, दशरथ चवरे,मुब्बशीर खतीब,दत्तात्रय मजमुले, दिनकर जाधव,रविंद्र मेटे, शिव शाहिर बंडु खराटे, शेख अजिमोद्दीन,वली तांबोळी श्रीमती ज्योती सांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमा अंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे डी.डी.बनसोडे सर यांनी सरपंच सौ.जनाबाई काकडे यांच्या साबला येथील सरपंच पदाच्या काळात केलेल्या कामाची प्रशंसा केली,वाढदिवसा च्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,मुलगी शिकली पाहिजे त्यामुळेच शासनाने मुलींचे शिक्षण मोफत केले आहे.मुलीचे वर अठरा वर्षे होईपर्यंत लग्न करु नका,बाल विवाह आपल्या भागात होत असल्याचे दिसून आले तर त्वरीत कळवावे.

यावेळी सरपंच सौ. जनाबाई काकडे व आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांचा सत्कारमान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवशाहीर बंडु खराडे यांनी पोवाडा सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.श्रीमती ज्योतीताई सांबरे व वली तांबोळी यांनीसौ.जनाबाई काकडे यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमासाठी उपस्थित उप सरपंच सौ. कचराबाई सरवदे,ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,आदर्श शिक्षक सुधीर नाईकनवरे,हनुमंत कटारे,उमाशंकर शिंदे, गणेश कटारे,लखनराऊत, राहुल मुळे,विजयसिंह काकडे,हनुमंत काकडे, रामराजे काकडे,आकाश काकडे,रामराजे शिंदे, रामभाऊ काकडे,हनुमंत परळकर,नजीर काझी, फोटोग्राफर लखन कटारे नेहाल काझी,शिवाजी नाईकनवरे,हनुमंत नाईकनवरे,हनुमंत नाईकनवरे,श्रीमंत नाईकनवरे,महादेव नाईकनवरे,लक्ष्मण मुळे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण काकडे यांनी केले तर आभार नरहरी काकडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!