सामाजिकसाहित्यिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालय गांवासाठी दिशादर्शक – सरपंच अंजना गायकवाड स्वानंद सार्वजनिक वाचनालय ग्रामीण महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत – ग्राम पंचायत अधिकारी डी.एस.सरवदे

केज/ प्रतिनिधी

दि.२६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच १४ ते २८ जानेवारी २०२६ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन व इतर कार्यक्रम घेण्यात आले.सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ.राजेंद्र प्रसाद,पंडीत जवाहरलाल नेहरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड,ग्राम पंचायत अधिकारी डी.एस.सरवदे व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते पुजन व वंदन करण्यात आले.तसेच ग्रंथप्रदर्शन व वक्तृत्व स्पर्धा,गीतगायन स्पर्धा,काव्यवाचन,ग्रंथ वाचन,प्रश्नमंजुषा, अंताक्षरी,परिसंवाद, चर्चासत्र इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

सर्वप्रथम मार्गदर्शन करताना सरपंच सौ. अंजना गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.स्वानंद सार्वजनिक वाचनालय गावासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन सरपंच अंजना गायकवाड यांनी केले.तर स्वानंद सार्वजनिक वाचनालय हे ग्रामीण महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत अधिकारी डी.एस.सरवदे यांनी केले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक भोगजकर, शिवाजी नाना गायकवाड, गोविंद गायकवाड,निलेश गायकवाड व इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.ग्रंथ प्रदर्शनाला ही सरपंच, उपसरपंच,माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्यासह रामेश्वर गायकवाड,तुकाराम गायकवाड,शिवाजी गायकवाड,चंद्रकांत गायकवाड,बबन पौळ, किसन जोगदंड,ज्ञानेश्वर गायकवाड, कमलाकर साबळे,देविदास गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड,बालासाहेब गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड,महेश गायकवाड,सुंदर अप्पा गायकवाड,कालीचरण गायकवाड,रामराजे गायकवाड, माणीक बप्पा गायकवाड,रामराव तात्या गायकवाड,रावसाहेब जाधव,ऑपरेटर विजय थोरात,नागेश्वर वैरागे, विठ्ठल गावरस्कर,एस.के. वैरागे,हरिदासगायकवाड, श्रीधर गायकवाड,पांडुरंग गायकवाड,वामन गायकवाड, रामदास राऊत महादेव राऊत ,संजय सोनवणे, अरुण गायकवाड, वेदिका गायकवाड,दिव्या साबळे,विरा सोनवणे, कल्याणी घोगले,मयुरी गायकवाड,सुशांतसौदागर,स्वरा गायकवाड,शौर्य गायकवाड,रामकृष्ण तात्या गायकवाड, बालासाहेब गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी,वाचक,युवक, जेष्ठ नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.त्यानंतर दिवसभर ग्रंथ प्रदर्शनासह वकृत्व स्पर्धा,गीतगायन स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा,शब्दकोडी स्पर्धा,ग्रंथवाचन स्पर्धा, परिसंवाद,चर्चासत्र, विविध विजेत्यांना पुरस्कार वितरण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. विविध स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!