प्रशासकीयसामाजिक

विकसित भारत 2047 संकल्पना साकार करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता -प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख

अंबड/प्रतिनिधी

 

विकसित भारत 2047 ही भारत सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी संकल्पना असून ती साकार करण्यासाठी सर्व स्तरावर अगदी एका व्यक्तीपासून ते कुटुंब,खेडी शहरे, तालुका,जिल्हा,राज्य, राष्ट्र इत्यादी स्तरावर नियोजन करून त्या नुसार देशाच्या विकासा कडे वाटचाल करण्या साठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री व माजी आरोग्य मंत्री आणि मत्स्योदरी शिक्षण संस्था,जालना चे अध्यक्ष श्री.राजेश टोपे यांच्या मार्गदर्शना खाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंबड व व्ही.आर‌.दाडगे लायब्ररी फाउंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत @2047 या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन अंबड येथे नुकतेच संपन्न झाले.दि.15 ऑगस्ट 2047 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्धापन दिना चेऔचित्य साधून भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विकसित भारत 2047 ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना भारत सरकारने मांडली आहे. या योजनेअंतर्गत देशाची आर्थिक उन्नती, आधुनिक तंत्रज्ञान विकास,युवा,गरीब, महिला व शेतकरी या चार घटकांच्या सक्षमी करणावर विशेष भर देण्यात येणार आहे.

सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण,आरोग्य सुविधा, प्रगत तंत्रज्ञान,भौतिक सुधारणा,सामाजिक विकास,समृद्ध अर्थ व्यवस्था,अन्नसुरक्षा, जलसंधारण, पर्यावरण विकास, दारिद्र्य निर्मूलन ,कृषी व औद्योगिक क्षेत्र विकास, सक्षम व पारदर्शक प्रशासन, ग्रीन एनर्जी विकास इत्यादींच्या माध्यमातून खेडी,शहरे,राज्य व देश समृद्ध बनवणे हा या योजनेचा हेतू आहे.केंद्र सरकारची ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर नियोजन करून त्यानुसार प्रगती कडे वाटचाल करणे यासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता आहे असे ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित होते. यावेळी कर्नाटका विद्यापीठाचे डॉ.गुरुराज हडळगी,एसएनडीटी विद्यापीठाचे डॉ.सुभाष चव्हाण, डॉ.बी.आर. गायकवाड, डॉ.नितीन दगडे, डॉ.जे.एन. कुलकर्णी, डॉ.जी.डी‌. सागर ,डॉ.व्ही.एम.पवार इत्यादींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महा विद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.शिवशंकर घुमरे व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले‌. सदर राष्ट्रीय अधिवेशनास देशभरा तून विविध विद्यापीठे व महाविद्यालयाचे सुमारे 80 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!