प्रशासकीयसामाजिक

मांजरा धरणाची ८६ कोटीची पाणी पट्टी थकली 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण हे बीड जिल्ह्यातील प्रमुख एक असलेले धरण असून,मांजरा धरणातून लातुर,बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील एकूण २२ पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा केला जातो. आज मितीस मांजरा धरणावरील २२ पाणी पुरवठा योजनांकडे ८६ कोटी, ६ लाख २३ हजार ७५५ रुपये एवढी पाणी पट्टीची थकबाकी आहे.

बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या मांजरा नदी वर उभारण्यात आलेल्या मांजरा धरणातून बीड जिल्ह्यातील ९,धाराशिव जिल्ह्यातील ७ आणि लातुर जिल्ह्यातील ६ अशा एकूण २२ पाणी पुरवठा योजनांकडे ८६ कोटी ६ लाख २३ हजार ७५५ रुपयांची पाणी पट्टी थकबाकी आहे.

पाणी पुरवठा योजणांना नोटीस.

बीड,धाराशिव व लातुर जिल्ह्यातील एकूण २२ थकबाकीदार पाणी पुरवठा योजना व संस्थांना आपल्याकडील थकबाकी दहा दिवसात भरण्या संबंधी लातुर येथील पाटबंधारे विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या असून वेळेत थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित नितनवरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

पाणी साठा ८३ टक्के.

बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या नोंदीनुसार ६४१.६६ मीटर एवढी पाणी पातळी आहे. १९३.९८४ दलघमी एकूण पाणी साठा आहे. तर ८२.९९टक्के धरण आज रोजी भरलेले आहे. त्यामूळे पुढील वर्षाअखेर पुरेल एवढा पाणी साठा आज रोजी मांजरा धरणात असल्याची माहिती माहिती मांजराचे शाखा अभियंता अनुप गिरी यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!