राजकीय

शिवदास थळकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक केज तालुका अध्यक्षपदी निवड

केज/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीच्या संघटनात्मक बांधणीस गती देण्यासाठीनुकतीच केज तालुक्यात नवीन पदनियुक्ती करण्यात आली.शिवदास उमाकांत थळकरी यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवदास थळकरी हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहिले असून युवकांना राजकारणात व समाजकारणात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.पक्षाच्या विचारधारे प्रति निष्ठा ठेवून त्यांनी विविध स्तरांवर काम केले.

असून त्यामुळेच त्यांच्या वर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीनंतर थळकरी यांनी पक्षश्रेष्ठीं प्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच आगामी काळात केजतालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी व युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील पक्षाचे  कार्यकर्ते, पदाधिकारी व  युवकांनी आनंद व्यक्त केला असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या नियुक्ती मुळे केज तालुक्यातील युवकांमध्ये नवचैतन्य संचारेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!