सामाजिक

बीड जिल्हा वकील संघ महिला प्रतिनिधी अॕड. मनीषा कुपकर-पाटील यांची उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समोर ठोस मांडणी

बीड/प्रतिनिधी

बीड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर, हॉटेल ग्रँड यशोदा,बार्शी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,शिवसंग्राम व समाजवादी पक्षांच्या युती तर्फे सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार हे उपस्थित होते.

शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.ज्योतीताई विनायक रावजी मेटे तसेच शिवसेनेचे नेते अनिलजी जगताप,बळीराम गवते शिवसंग्रामचे मराठवाडा प्रमुखअनिल घुमरे, शहराध्यक्ष शिवसंग्राम सुहास पाटील तसेच मनोज जाधव शहरातील डॉक्टर,वकील,प्राध्यापक, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संवाद मेळाव्यात सहभाग घेतला.या प्रसंगी बीड जिल्हा वकील संघाच्या महिला प्रतिनिधी आणि शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॕड.मनीषाताई कुपकर -पाटील यांनी बीड न्याय व्यवस्थेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न थेट उप मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

ही कोणतीही राजकीय सभा नसून,बीड च्या सर्वांगीण विकासा साठी व न्यायव्यवस्थेला भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्याची संधी आहे, असे त्या म्हणाल्या.अँड. मनीषाताई कुपकर- पाटील यांनी सर्वप्रथम नवीन बीड न्यायालय इमारतीसमोरील नॅशनल हायवेवरील दुभाजकाचा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाकडे थेट रस्ता नसल्यामुळे नागरिकांना दीड किलोमीटर फेरी मारून यावे लागत असल्याने मोठी गैरसोय निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयात रोज ग्रामीण भागातील नागरिक येतात फेरी मारून येताना अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.यावर तात्काळ उपाययोजना व्हावी अशी त्यांची मागणी होती.यानंतर त्यांनी नवीन वकिलांना किमान दोन वर्ष मानधन देण्याची मागणी केली.

लाडकी बहीण योजने प्रमाणेच वकिली क्षेत्रात नवीन येणाऱ्या तरुणांना व्यवस्थित अभ्यास करता यावा,चांगली प्रॅक्टिस उभी करता यावी म्हणून त्यांना आर्थिक आधार योजना मिळावी असेही त्या म्हणाल्या.तसेच बीड जिल्हा न्यायालयात सुसज्ज महिला वकील कक्षाची निर्मितीकरण्याची मागणी त्यांनी केली. दररोज न्यायालयात अनेक महिला वकील कार्यरत असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी,सोयी सुविधांसाठी स्वतंत्र व सुसज्ज महिला कक्ष आवश्यक आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

शिवसंग्राम महिला आघाडी जिल्हाध्यक्षा म्हणून बोलताना अॕड. मनिषाताई कुपकर- पाटील यांनी शिवसंग्रामचे संस्थापक लोकनेते विनायकराव मेटे यांची आठवण करून दिली. साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले.मराठाआरक्षणासाठीलढतांना वीरमरण प्राप्त केलेल्या साहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अजितदादांसोबत खंबीर आहोत असे त्या भावनिक भाषणात म्हणाल्या.बीडचा बिहार नव्हे,तर बीडची बारामती व्हावी एवढीच अपेक्षा आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

या सुसंवाद बैठकीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,आमदार विजयसिंह पंडित,शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप,ॲड.बाळासाहेब कोल्हे,प्रभारी अध्यक्ष अॕड.रघुराज देशमुख, सचिव अॕड.सुभाष काळे, सहसचिव अॕड.धीरज कांबळे,अॕड.योगेश चिकेकडे,अॕड.सय्यद अजीम यांच्यासह बीड जिल्ह्यातील अनेक वकील बांधव,डॉक्टर, प्राध्यापक,सीए,व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!