सामाजिक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड येथे महाराष्ट्र राज्य सहकार संघ व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सहकार प्रशिक्षणाचे आयोजन – प्रा.बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकार संघ पुणे यांचे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ ते रविवार १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नागरी,ग्रामीण,बिगर शेती,पगारदार,सेवक सहकारी पतसंस्था, संचालक,कर्मचारी यांच्या करिता दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे.

या प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून एन.एन.कुलकर्णी सोलापूर, एस.आर.कोळे उप प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर सी. ए.खोडसे साहेब प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड हे उपस्थित राहून योग्य कर्ज वाटप,व वसुली संबंधित कायद्यातील तरतुदी,एम आय एस माहिती,सी आर ए आर,एस एल आर,सी डी रेशो सहकार कायद्या तील तरतुदी,लेखापरीक्षण महत्त्व,ऑडिटगुण निकष, उपविधी दुरुस्ती,इत्यादी विषयावर माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रशिक्षणाचे वर्ग संयोजक एस.आर.कोळे हे आहेत तरी या प्रशिक्षणास बीड तालुक्यातील सर्व नागरी ग्रामीण,सेवक सहकारी पतसंस्था संचालक, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्रा.बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!