श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त केज येथे त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन

केज/प्रतिनिधी
दि.१३ सप्टेंबर रोजी श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्रीराम मंदिर,केज येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणूक निघणार आहे.संध्याकाळी ७.०० वाजता ७५० दिव्यांनी दीपोत्सव संपन्न होणार आहे.दि.१३ सप्टेंबर रोजी ह.भ.प.संतोष महाराज बिडगर (अंबाजोगाई),दि.१४ सप्टेंबर ह.भ.प.श्री बापू महाराज दातार (निफाड)दि.१५ सप्टेंबर रोजी सौ.तेजस्विनी धानोरकर (पुणे) यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
कीर्तनासाठी पंडित गंगाधर देव, श्री.बाळासाहेब अलासकर, श्री पद्मनाभ देव या मान्यवरांची साथ संगत लाभणार आहे. दिनांक15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाने कीर्तन महोत्सवाची सांगता होईल.तरी सर्व भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन कीर्तन महोत्सव संयोजन समितीचे श्री. सचिनराव देशपांडे व ह. भ. प. श्री. भालचंद्र महाराज देव यांनी केले आहे.



