नैसर्गिक संकटात बळीराजाला दिलासा ; श्रीक्षेत्र पावनधाम संस्थानचा पुढाकार ५१ शेतकऱ्यांना मोफत हरभरा बियाण्यांचे वाटप

केज/प्रतिनिधी
नैसर्गिक संकटात श्री क्षेत्र पावनधाम संस्थान ने बळी राजाला दिलासा दिला असून धारुर तालुक्यातील ५१ शेतकरी बांधवांना हरभरा बियाणे वाटप करुन दिलासा दिला आहे.याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांवर यंदाच्या अतिवृष्टीचे प्रचंड संकट कोसळले असून,शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.पिकांचे नुकसान,मातीची धूप आणि आर्थिकअडचणींनी त्रस्त झालेल्या अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री जगद्गुरू तुकोबाराय पावन धाम संस्थान,औरंगपुर ता.केज,जि.बीड यांच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
या सामाजिक बांधिलकी च्या उपक्रमा अंतर्गत ५१ शेतकऱ्यांना मोफत हरभरा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर २० किलो बियाणे देण्यात आले.हा उपक्रम दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता धारुर येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
या उपक्रमाचे आयोजन महंत ह.भ.प.श्री.महादेव महाराज बोराडे शास्त्री (श्री जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान)यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या वेळी विविध सामाजिक,औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी सुभद्रा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज,पुणे, तसेच नामदेव इंदरराव गोरे,संजय गोपाळराव देशपांडे,एम.एस.दत्ता, सुधीर कोसलगे,ज्ञानेश्वर हिवरेकर,जालिंदर भाऊ कुटे आणि दिनेश शेठ सुराणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला प्राचार्य गोपाळ काकडे,प्रकाश करपे,वैभव कोटूळे, बाळासाहेब खामकर, कुंभार सर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.अतिवृष्टी मुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीला पुन्हा उभारी देण्यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण भागात आशेचा किरण ठरला आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली असून, समाजातील संस्थात्मक सहकार्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाआहे. त्याच्या अडचणीच्या काळात समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सेवा आहे, असे मत महंत ह.भ.प.श्री.महादेव महाराज बोराडे यांनी व्यक्त केले.हा उपक्रम केवळ बियाण्यांचे वाटप न राहता बळीराजाच्या आत्मविश्वासाला दिलेला नवसंजीवनीचा हात ठरला आहे.यावेळी लाभार्थी बळीराजाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.



