सामाजिक

जलजीवनसाठी भरीव निधी द्या ; खा.बजरंग सोनवणेंनी पाण्यासाठी संसदेचे वेधले लक्ष, विविध योजनांना भरीव निधी देण्याबाबत धरला आग्रह

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात ‘हर घर जल’ देण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. परंतु मागील दोन वर्षात या योजनेला निधीच दिला जात नाही.यामुळे योजना मंजूर असूनही गावात पाणी पोंहचू शकले नाही. सामान्य नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी जल जीवन योजना महत्वाची असून यासाठी भरीव निधी द्या,अशी आग्रहाची मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली.याच बरोबर त्यांनी विविध योजनांसाठी निधीची मागणी करत संसदेचे लक्ष वेधले.

दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात खा.बजरंग सोनवणे यांनी मुद्देसूद मांडणी करत बीड जिल्ह्यातील प्रश्न मांडले. संसदेत पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले,भारत हा कृषी प्रधान देश आहे असे असले तरी शेतकऱ्यां साठी केंद्र सरकार भरीव निधी देत नाही. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणे आवश्यक आहे.याच बरोबर मराठवाड्यातील धाराशीव-बीड-संभाजी नगर या रेल्वेमार्गासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे.

सन २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आलेले आहे. तेंव्हापासून जुन्नर-चौंडी-आष्टी या नवीन रेल्वेमार्गाला निधी मिळत नाही.हा मार्ग व्हावा,यासाठी निधीची आवश्यकता आहे.याच बरोबर मागील अनेक वर्षांपासून अहिल्यानगर -बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे.या कामाला मागील काळात गती मिळू शकली नाही. यामुळे कामाला उशीर झाला.निधी उपलब्ध असताना कामाला गती मिळू शकली नाही.आता काम गतीने सुरू आहे, निधी कमी पडत असल्यास तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पोस्ट ऑफिस बंद पडले आहेत,ते पुन्हा सुरू करावेत,शिवाय काही ठिकाणी नवीन कार्यालय देखील सुरू करावेत,तशी नागरिकांची मागणी देखील आहे.

आता मोबाईलचा काळ आलेला आहे.परंतु असताना बीड जिल्ह्यात आजही विविध भागात मोबाईलची रेंज पोहचलेली नाही.आम्ही बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोबाईलटॉवरची गरज आहे,अशी यादी केंद्राकडे दिलेली आहे. सदरील ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर उभारावेत, बीड जिल्ह्यात दळण वळणाचा मोठा प्रश्न आहे. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे देशभर रस्त्याचे जाळे निर्माण करतआहेत. बीड जिल्ह्यात देखील चार पदरी आणि सहा पदरी महामार्गाची गरज आहे.

अनेक महत्वाच्या मार्गाची आम्ही मागणी केलेली असून तीरस्त्याची मागणी मार्गी लावावी, जिल्ह्यात आरोग्ययंत्रणेचा बोजवारा उडत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा मिळत नाहीत.आरोग्य केंद्रांना मोठा निधी देवून आरोग्याच्या बाबतीतील प्रश्न सोडवावेत,बीड जिल्हा हा ऊसतोड मजूरांचा जिल्हा आहे.या जिल्ह्यातून महाराष्ट्रआणि महाराष्ट्राबाहेर देखील मजूर काम करतात.अशा वेळी त्यांच्या पाल्यांची शाळा सुटते.त्यांच्या पाल्यांसाठी साखर कारखान्यावर शाळा सुरू करण्यात याव्यात, पंतप्रधान आवास योजने मधून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरे मंजूर केलेली आहेत.परंतु सद्यस्थितीत मिळत असलेल्या निधीतून घराचे बांधकाम पुर्ण होत नाही. यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किमान ५ लाख रूपये निधी द्यावा, ५ लाख रूपये निधी दिल्यास गरीबांचे घर पुर्ण होईल.बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेतून साडे बाराशेवर योजना मंजूर आहेत.

या योजनेतून हर घर जल देण्याचाउद्देश आहे.परंतु दोन-तीन वर्षां पासून निधी दिला जात नसल्याने योजना अपुर्ण आहेत. या योजनेला पैसे दिले तर गावात नळाला पाणी दिसेल. मग्रारोहयो मधून चांगली कामे करता येतात,परंतु त्यालाही निधी द्या,यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळत नाही.या योजनेसाठी देखील निधी द्यावा आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह द्यावे,त्यांच्या लेकरांचे शिक्षण व्हावे,त्यांनीही नोकरी करावी,यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागण्या खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!