केज भाजपचा निष्ठेचा कणा डॉ.वासुदेव नेहरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; केज तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव ! निस्वार्थी योद्धा आणि मुंडे भगिनींचा खंदा समर्थक म्हणून सर्व सामान्यांत ओळख, शून्यातून पक्ष संघटना उभारणाऱ्या नेतृत्वाचा गौरव.

केज/प्रतिनिधी
राजकारणात सत्तेची पदे येतात आणि जातात,मात्र विचारांशी असलेली प्रामणिक निष्ठा हीच खरी संपत्ती असते.केज तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा असाच एक ‘निष्ठेचा कणा’म्हणून ओळखले जाणारे डॉ. वासुदेव नेहरकर यांचा वाढदिवस शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघर्षाच्या काळात जपली पक्षाची मशाल ज्या काळात केज तालुक्यात भाजपची ताकद नगण्य होती,त्या खडतर काळात डॉ.नेहरकर यांनी खऱ्या अर्थाने पक्षाची मशाल तेवत ठेवली.लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी खेड्यापाड्यात पक्ष संघटना पोहोचवली.कै. संजय पाटील,बाळासाहेब बोराडे,भगवान केदार आणि सुरेंद्र तपसे या सारख्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी संघर्षाच्या काळात भाजप ला केज तालुक्यात जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक काम केले आहे.पदांपेक्षा ‘निष्ठा’ हीच मोठी संपत्ती
डॉ.नेहरकर यांनीआपल्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत.संघटनात्मक बांधणी युवा मोर्चा व तालुका सरचिटणीस म्हणून प्रभावी कार्य.आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष, वैद्यकीय आघाडी म्हणून गरजूंची सेवा, सहकार क्षेत्र सदस्य,केज तालुका खरेदी-विक्री संघ आणि उपसभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती यासर्व पदां पेक्षा लोकनेत्या पंकजाताई मुंडे,खा. प्रीतमताई मुंडे आणि आ. नामिताताई मुंडे यांचे विश्वासू निष्ठावंत ही ओळख त्यांनी अधिक अभिमानाने जपली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व नेत्यांनी त्यांना विशेष शुभेच्छा देऊन गौरविले.
कार्यकर्त्यांचा आधारवड आणिनिस्वार्थी नेता कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाची अपेक्षा न ठेवता सामान्य कार्यकर्त्याला नेत्यांपर्यंत पोहोचवून त्याचे प्रश्न मार्गी लावणे, ही डॉ.साहेबांची कामाची पद्धत आहे.कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा आणि सत्तेच्या माध्यमातून विकासनिधी मिळवून देण्यात सदैव आघाडीवर असणारा आधारवड म्हणून आज त्यांची ख्याती आहे.
डॉ. वासुदेव नेहरकर म्हणजे केज भाजपचा असा चेहरा,ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि आजही सामान्य कार्यकर्त्यासाठी ते ढाल बनून उभे आहेत.प्रकाश मुंडे,केज यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला असून,त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो,अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.



