वैज्ञानिक

२ ऑगस्टला दिवसात अंधार पडणार? सोशल मीडियावरील मेसेज खोटा ; यंदा सूर्यग्रहण नाही!

केज/प्रतिनिधी

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे,ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, दी.२ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण जगात तब्बल ६ मिनिटांसाठी दिवसाही अंधार पडणार आहे कारण त्या दिवशी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. या मेसेज नंतर अनेक नागरिक याचा प्रभाव आणि सत्यता जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.मात्र,तज्ज्ञांच्या माहितीनुसार,यावर्षी २ ऑगस्टला कोणतेही सूर्यग्रहण होणार नाही. त्यामुळे सोशल मीडिया वरील हा दावा पूर्णतः खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.खरंतर, ज्यावेळी सूर्यग्रहण होते तेव्हा काही काळासाठी अंधार निर्माण होतो, पण हे नेहमीच अमावस्येला (नवी चंद्र) होते,आणि चंद्रग्रहण पोर्णिमेला.यंदा २ ऑगस्ट २०२५ रोजी अमावस्या नाही,त्यामुळे त्या दिवशी सूर्यग्रहण होणे शक्यच नाही.

तसेच,असा उल्लेख करण्यात आला आहे की,हे या शतकातील सर्वात लांब सूर्यग्रहण असणार आहे.पण वस्तुस्थिती अशी आहे की,सर्वात लांब सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी लागणार आहे,म्हणजे हे घटनेचे संभाव्य वर्ष २०२७ आहे,२०२५ नाही.

तथापि,नागरिकांनी अशा असत्य आणि अप्रामाणिक मेसेज वर विश्वास ठेवू नये,आणि अधिकृत शास्त्रीय किंवा खगोलशास्त्रीय संस्थां कडून सत्य माहिती मिळवावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!