सामाजिक

केज तालुका भाजपा संघटन मजबूत करण्या साठी बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांची संयुक्त बैठक संपन्न.श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जयंती साजरी

केज/प्रतिनिधी

केज तालुका भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांची संयुक्त सुसंवाद बैठक उत्साहात पार पडली.तसेच याच कार्यक्रमात श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. गुरुवार दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९-३० वाजता केज येथील वसुंधरा शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यांच्याराष्ट्रसेवेतील योगदानाला उपस्थितांनी अभिवादन केले.

भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ पातळी वरील कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी ही बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या टीम च्यामाध्यमातून आयोजित करण्यात आली होती. केज पूर्व व केज पश्चिम मंडल अंतर्गत बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची ही संयुक्त बैठक लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे,मा. खासदार प्रीतमताई मुंडे व आमदार नमिताताई मुंदडा यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली.या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या टीममधील अक्षय देशमुख,भूषण जाधव व जीवन आदाटे यांनी उपस्थित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.बूथ स्तरा वर पक्षकार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवावे, सामान्य नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क कसा वाढवावा,तसेच संघटनात्मक शिस्त, एकजूट व कार्यकर्त्यांची भूमिका यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा दरम्यान केज तालुक्यातील आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्राम पंचायत कोल्हेवाडीचे सरपंच चंदू मिसाळ व सारणी (सां) चे सरपंच राहुल ओव्हाळ यांचा केज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यांच्या कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.यावेळी केज पूर्व मंडल अध्यक्ष भगवान केदार,केज पश्चिम मंडल अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह नेताजी पापा शिंदे,सुनील आबा गलांडे, महादेव सूर्यवंशी,राहुल भैय्या गदळे,सुदाम पाटील,मुरलीबप्पा ढाकणे आदी प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी व आगामी काळात भाजपाचा जनाधार वाढवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या सुसंवाद बैठकीमुळे केज मतदारसंघात भाजपाच्या बूथ स्तरावरील कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!