वाणिज्यसामाजिक

आडस येथे आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न, रिझर्व बँकेचा आर्थिक साक्षरता उपक्रम क्रिसील फाउंडेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात यशस्वी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आडसचे व्यवस्थापक वाघमारे सर यांची उपस्थिती 

केज/प्रतिनिधी

भारत सरकारच्या पुढाकाराने व रिझर्व बँकेच्या प्रेरणेने व बँक ऑफ महाराष्ट्र च्या सहकार्याने,आणि मनी वाईज वित्तीय साक्षरता केंद्राच्या माध्यमातून आडस येथे आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेद च्या बचत गट सि आर पी लताताई रोडगे मॅडम यांनी केले तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती मनि वाईज वित्तीय साक्षरता केंद्र वडवणीचे व्यवस्थापक अश्विनीकुमार डावरे यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या बँकिंग क्षेत्रातील विविध योजना उपस्थित त्यांना समजून सांगण्यात आल्या.

बँकेत जन धन खाते उघडणे,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,अटल पेन्शन योजना,नॅशनल पेन्शन सिस्टीम, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुर्य घर योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगयोजना, मुद्रा योजना यांसह बँकिंग क्षेत्रातील विविध योजना गावातील उपस्थितांना समजून सांगितल्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आडस चे व्यवस्थापक वाघमारे सर यांनी डिजीटल व्यवहार आणि सायबर फ्राॕड,बॅंक लोकपाल,बचत आणि गुंतवणूक याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र केजतालुका फिल्ड काॅर्डिनेटर शितल वड्डे मॅडम यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बचत गटातील महिलां व आडस गावचे बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.हाकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचतगट सि आर पी ताई, बचत गट अध्यक्षा आणि मनी वाईज वित्तीय केंद्र केज तालुका क्षेत्र समन्वयक शितल वड्डे मॅडम यांनी परीश्रम घेतले .

तर यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना,अटलपेन्शन योजना आणि सुकन्या समृद्धी योजना चे ऑफ लाईन अर्ज भरून घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!